समजावुनी व्यथेला
मी रोज साद देतो
आकाश वेदनेचे
माळून रोज घेतो
दुःखात वेदनेच्या
मी भंगल्या स्वरांनी
बांधून चाळ पायी
आपुलाच वेध घेतो
कितीदा आवाज द्यावा
कितीदा पुन्हा पाहावे
ही भयाण रात्र पुन्हा
न्याहाळीत झोपी जावे
मी मोजका मुशाफिर
केंव्हा मला न कळले
ह्या वाटेवरी मुशाफिर
परतून नाही आले
हा हुंदका कशाला
हा गलबला नको रे
गलबत वारूंवरचे
वाऱ्यासवे बुडाले